नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या विविध योजनांची चर्चा राज्यभर होत आहे. दलित, महिला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी सरकारकडून अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांना प्रतिमहिना 10,000 रुपये कमावण्याची संधी उपलब्ध होत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी केवळ सहा दिवस शिल्लक आहेत.
तरुणांना मिळणार 10,000 रुपये
मित्रानो राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत काही तरुण-तरुणींची निवड केली जाईल. निवडलेल्या योजनादूतांना सरकारच्या योजना सर्वसामान्यांना समजावून सांगायच्या आहेत. या कामासाठी त्यांना प्रतिमहिना 10,000 रुपये मानधन दिले जाईल. मित्रानो निवड झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत हे मानधन मिळणार आहे. राज्यभरातून एकूण 50,000 योजनादूतांची निवड केली जाणार असून, यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
या शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा होणार १० हजार रुपये अनुदान, जिल्हानिहाय यादी येथे पहा …..
अर्ज करण्यासाठी शेवटची संधी
तरुणांना प्रतिमहिना 10,000 रुपये कमवण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवार 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर नोंदणीसाठी संधी दिली जाणार नाही. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि त्याला संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. मित्रानो तसेच अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे
मित्रानो मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करताना आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, पदवीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला (सक्षम यंत्रणेच्या सही आणि शिक्क्यासह), वैयक्तिक बँक खात्याचा तपशील यांसारखी कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवार https://www.mahayojanadoot.org/ या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात. चला तर मग आवडली का माहिती आवडल्यास इतर मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा.