नमस्कार मित्रांनो, अटल बांचकाम कामगार आवास योजना ही बांधकाम कामगारांसाठी असलेली एक महत्याची योजना आहे, ज्यामध्ये कामगारांना घरकूल निर्माण करण्यासाठी आणि जागा खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना जागा खरेदीसाठी १ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे.
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
बांधकाम क्षेत्रातील कामगारांना स्वतःचे घर किंवा जागा मिळवण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे.
योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना जागा खरेदीसाठी १ लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाईल.
लाभार्थी पात्रता
लाभार्थी बांधकाम क्षेत्रात काम करणारा असावा.
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी आवश्यक.
राज्य सरकारची मोठी घोषणा : शेतकऱ्यांना मिळणार ४० हजार रुपये नुकसान भरपाई ….
कामगाराचे किमान ९० दिवसांचे बांधकाम कामकाजाचे प्रमाणपत्र असावे.
अर्ज प्रक्रिया
अर्जदाराने संबंधित कामगार मंडळ किंवा प्राधिकरणाकडे अर्ज करावा.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत (ओळखपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, कामाचा पुरावा इ.)
राज्यातील बांधकाम कामगार कल्याण मंडळ या योजनेची अंमलबजावणी करते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार या योजनेचा उद्देश बांधकाम क्षेत्रातील कामगारांना घरे मिळवण्यासाठी मदत करणे हा आहे.
या योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी १ लाख रुपयांचे सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे बांधकाम कामगारांना घरे खरेदी करणे सोपे होईल.
राज्य सरकारचा मोठा निर्णय : मुलगी असेल तर मिळेल १ लाख रुपये……
योजना अधिक प्रभावी करण्यासाठी सरकार विविध ठिकाणी अर्ज प्रक्रिया सोपी करत आहे, आणि योग्य लाभार्थ्यांना ही योजना मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे.
अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी १ लाख रुपये अर्थसहाय्यासाठी अर्ज कसा करावा ते खाली दिलेले आहे.
अर्ज कसा करावा ?
1) महाराष्ट्र श्रम विभागाची https://mahabocw.in/ या अधिकृत वेबसाईट येथे भेट द्या.
2) वेबसाईटवर नवीन नोंदणी करावी लागेल, जर तुम्ही आधी नोंदणीकृत नसलात तर.
3) वेबसाईटवरील अटल बांधकाम कामगार आवास योजना पर्याय निवडा.
4) आवश्यक माहिती आणि कागदपत्रे (ओळखपत्र, रोजगार प्रमाणपत्र, जागेची माहिती इत्यादी) अपलोड करा.
5) सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सादर करा आणि अर्ज क्रमांक सुरक्षित ठेवा.
महत्वाची कागदपत्रे
बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा,आधार कार्ड,जागा खरेदीची कागदपत्रे (जमीन खरेदीसाठी).
Me handicapt ahi pl🙏