नमस्कार मंडळी काही लोक बाईक किंवा कार चालवताना चप्पल किंवा स्लीपर वापरतात. अशा स्थितीत चप्पल घालून वाहन चालवल्यास दंड होऊ शकतो, अशी अनेकांची धारणा असते. पण हे खरं आहे का, यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे.
भारतात वाहन चालवण्यासाठी काही नियमांचे पालन आवश्यक आहे. केंद्र सरकारने 2019 साली मोटर वाहन कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले होते, ज्यामुळे वाहतूक नियम अधिक कडक करण्यात आले. यामध्ये हेल्मेट वापरणं, वाहन चालवताना सीट बेल्ट लावणं यांसारखे मूलभूत नियम पाळणे बंधनकारक आहे. विशेषता बाईक चालवताना चालक आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घालणे अत्यावश्यक आहे.
नवीन नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चप्पल किंवा स्लीपर घालून वाहन चालवणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे वाहन चालवताना योग्य बूट वापरणं सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. अपघात झाल्यास बूट किंवा सँडलमुळे पायाचे संरक्षण होते, तर चप्पलमुळे पाय दुखावण्याची शक्यता अधिक असते. गिअर बदलताना किंवा ब्रेक मारताना देखील चप्पलमुळे त्रास होऊ शकतो. म्हणून, वाहन चालवताना शक्यतो चांगले बूट वापरण्याचा सल्ला दिला जातो.
नवीन नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दंडाबाबत बोलायचं झाल्यास, सध्या चप्पल घालून वाहन चालवल्यास थेट दंडाची तरतूद नाही पण मित्रांनो सुरक्षिततेच्या आणि वाहन नियंत्रणाच्या दृष्टीने हे टाळणे योग्य ठरते.