शासनाकडून विद्यार्थ्यांच्या भत्त्यामध्ये वाढ, नवीन नियमानुसार लाखो विद्यार्थ्यांना होईल फायदा

सन 1948 च्या सुमारास संपूर्ण देशभरामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय छात्र सेना सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती वाढावी आणि देश प्रेमात वाढवावी यासाठी ही अभिनव चळवळ राबविण्यात आली होती आणि आता पण संपूर्ण देशभरात लाखो विद्यार्थी छात्र सेनेमध्ये कार्यरत आहेत.

छात्र सेनेची तरतूद आणि रचना व्यवस्थित पद्धतीने व्हावी यासाठी 1948 मध्ये राष्ट्रीय छात्र सेना कायदा – 1948 सुरू करण्यात आला. राष्ट्रीय छात्र सेनेतील विद्यार्थ्यांसाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून विविध भत्ते प्रदान केले जातात आणि यातील एका भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. छात्रसेनेतील विद्यार्थ्यांना विविध कारणांसाठी हे भत्ते प्रदान केले जातात आणि त्यातील धुलाई तसेच चकाकी हप्त्यामध्ये हा बदल करण्यात आलेला आहे.

नवीन शासन निर्णय आला : आता लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळेल नुकसान भरपाई, पहा शासन निर्णय ……..

केंद्र शासनाच्या माध्यमातून धुलाई आणि चकाकी हप्त्यामध्ये 10 रुपयांवरून 30 रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आणि त्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयांमध्ये ही बाब विचारधिन होती आणि त्याच अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय प्रारित करण्यात आला.

राज्य शासनाच्या वतीने कनिष्ठ छात्र सैनिकांना आठ महिन्यांसाठी व वरिष्ठ छात्र सैनिकांना सहा महिन्यांसाठी धुलाई आणि चकाकी भत्ता 30 रुपयांवरून 41 रुपयांपर्यंत वाढवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. शासन निर्णय प्रारित झालेल्या 11 सप्टेंबर 2024 पासून सदर नियम लागू केले जातील.

शासन निर्णय

या योजनेची यशस्वी पद्धतीने अंमलबजावणी होण्यासाठी क्रीडा व युवक सेवा, आयुक्त पुणे यांना मुख्य नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे तर आहरण आणि संवितरण अधिकारी म्हणून समादेशक अधिकारी आणि राष्ट्रीय छात्र सेना यांवर ती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.

Leave a Comment