मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा : या रेशनकार्ड धारक मुलींना मिळणार १ लाख रुपये, लगेच यादीत नाव पहा

नमस्कार मित्रांनो सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक मदत मिळवण्यास प्रारंभ झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात लाभ न मिळालेल्या पात्र महिलांना 3000 रुपये दिले जात आहेत. योजनेत महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये मिळतात. पण लेक लाडकी या योजना संदर्भात काही लोकांना माहिती नाही. या योजनेद्वारे मुलींना 75,000 रुपये आर्थिक मदत प्रदान केली जाते. चला तर, या योजनेच्या उद्दिष्टे आणि अटी जाणून घेऊया.

योजनेचे उद्दिष्ट

राज्य सरकारने 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना लागू केली. या योजनेच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मृत्यूदर कमी करणे, बालविवाह टाळणे, कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे यांचा समावेश आहे.

१० सप्टेंबरपासून या यादीत पात्र असणाऱ्या नागरिकांना मिळणार महिन्याला ५ हजार रुपये आणि मोफत राशन

मुलींना मिळणारा लाभ

पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 6,000 रुपये, सहावीत 7,000 रुपये, अकरावीत 8,000 रुपये आणि वयाच्या 18 व्या वर्षी 75,000 रुपये असे एकूण 1,01,000 रुपये दिले जातात.

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

लेक लाडकी योजना GR

⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️

योजनेच्या अटी आणि शर्ती

1) पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात ही योजना लागू राहील.
2) 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुलींना ही योजना लागू राहील.
3) पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हफ्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. दुसऱ्या प्रसुतीत जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक किंवा दोन्ही मुलींना लाभ मिळेल. यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य आहे.
4) लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्यात रहिवासी असावे आणि बँक खाते महाराष्ट्रात असावे.
5) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

लेक लाडकी योजना फॉर्म

⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️

Leave a Comment