नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहतोय की आता ऑगस्ट महिना संपत आला आहे आणि मान्सूनचे तीन महिने पूर्ण झाले आहेत. आता फक्त मान्सूनचा एक महिना उरला आहे. या तीन महिन्यां मध्ये राज्या मधील बऱ्याच विविध भागांत चांगला पाऊस झाला आहे काही ठिकाणी तर अतिवृष्टीची परिस्थितीही निर्माण झालेली होती.
या महिन्याच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाला असला तरी गेल्या चार ते पाच दिवसां पासून पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो कोकण व मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरात पाऊस सुरू असला तरी त्यातही कमी झालेला आहे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
मोठी बातमी : सोन्या – चांदीच्या दरात मोठी घसरण, बाजारात प्रचंड गर्दी
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
परभणी जिल्ह्याचे हवामान अभ्यासक पंजाबराव डख साहेबांनी दिलेल्या नवीन हवामानाच्या अंदाजा नुसार, राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. चला तर मग पाहूया त्यांनी काय सांगितलेले आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख काय सांगतात ?
शेतकरी मित्रांनो पंजाबराव डख साहेब म्हणतात की आज आणि उद्या विदर्भातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील. मित्रांनो त्याचबरोबर २ सप्टेंबरपासून म्हणजेच बैलपोळ्याच्या दिवशी राज्यात मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात होईल.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे ३००० जमा , असे तपासा पैसे , नवीन यादी जाहीर
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
२ ते ६ सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यामधिल छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, जालना, बीड, परभणी, लातूर, हिंगोली, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, विदर्भातील बुलढाणा, वर्धा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डख साहेबांनी वर्तवली आहे.
शेतकरी मित्रांनो या दरम्यान राज्यातील सुमारे २१ जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार ओढून आले वाहणारा पाऊस होईल अशी शक्यता पंजाबराव डख साहेबांनी दिली आहे. मित्रांनो त्याचबरोबर मुंबई आणि कोकणातही चांगला पाऊस होईल असेही पंजाबराव डख साहेबांनी त्यांच्या अंदाजात सांगितलेले आहे.