नमस्कार मित्रांनो,ज्या नागरिकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांची लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे. कृपया तुम्ही तुमच्या गावातील सीएससी (सामाजिक सेवा केंद्र) केंद्रात जाऊन यादीत तुमचे नाव आहे का ते तपासा. जर तुमचे नाव यादीत असेल तर तातडीने केवायसी करून घ्या. केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पन्नास हजार रुपयांचे अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी, आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. सहकार विभागाने ३३,२५६ कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांना ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
थकीत यादी जाहीर
मित्रांनो या योजनेअंतर्गत, १४ लाख ३८ हजार खातेदारांना ५२१६ कोटी ७५ लाख रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. ३३,३५६ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण न झाल्यामुळे त्यांना हा लाभ मिळू शकला नाही. संबंधित शेतकऱ्यांनी त्वरित त्यांच्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. बँकांनीही खातेदारांना याबाबत सूचना कराव्यात, असा निर्देश सहकार विभागाने दिला आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मित्रांनो २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून ५० हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ दिला जात आहे. या योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.
या महिलांना मिळेल १८ हजार रुपये, आजच अर्ज करा…….
राज्यातील विविध बँकांनी एकूण २९ लाख २ हजार कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर सादर केली आहे. मित्रांनो त्यातील काही कर्जखाते अपात्र ठरली आहेत, कारण ती आयकरदाते किंवा पगारदार व्यक्तींशी संबंधित आहेत. ८ लाख ४९ हजार कर्जखाते एकाच वर्षात परतफेड झाल्यामुळे अपात्र ठरली आहेत. पात्र ठरलेल्या १५ लाख ४४ हजार कर्जखात्यांपैकी, १५ लाख १६ हजार कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे.