मित्रानो राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महा १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळते.आत्तापर्यंत लाखो महिलांच्या खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे मिळून एकूण ३००० रुपये त्यांच्या खात्यात आलेले आहेत. मित्रांनो काही महिलांना तांत्रिक अडचणी मुळे अद्याप त्यांच्या बँक खात्यात पैसेही आलेले नाहीत. तर काही महिलांनी अजूनही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अद्याप अर्ज केलेला नाही.
महत्वाचे म्हणजे मित्रांनो ज्या महिलांनी १ सप्टेंबरपासून नोंदणी केली आहे त्यांना मागील दोन महिन्यांचे पैसे आता त्यांना मिळणार नाहीत. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्या गडचिरोली दौऱ्यावर असताना त्यांनी सांगितलेले आहे की लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यास ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरू राहणार आहे. पण मित्रांनो ज्या महिन्यात नोंदणी होईल त्याच महिन्यापासून त्या तुझ्या अर्जदार महिला आहेत त्यांना महिन्याचे पैसे मिळतील. आतापर्यंत ७० ते ७५ टक्के महिलांची नोंदणी पूर्ण झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस, त्वरा करा
योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही डेडलाईन नसल्यामुळे महिलांना दिलासा मिळाला असला तरी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना आपले आधार क्रमांक आणि बँक खाते लिंक आहे की नाही हे तपासणे खूप गरजेचे आहे. कारण अनेक महिलांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले नाहीत या कारणामुळे त्यांचे जे पैसे आहेत ते त्यांच्या बँक खात्यामध्ये आले नाहीत. त्यामुळे अर्जदार महिलांनी आपले बँक खाते आणि आधार क्रमांक लिंक केलेले आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार २०,००० रुपये, नवीन GR पहा…….
बँक सीडिंग कसे तपासावे? – Ladki Bahin Yojana
मित्रांनो बँक सीडिंग स्टेटस तपासण्यासाठी तुम्ही युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (UIDAI) अधिकृत वेबसाईट वर जा.
1) वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला हवी ती भाषा निवडावी.
2) नंतर आधार सर्विस पर्यायावर क्लिक करा.
3) त्यानंतर आधार लिंकिंग स्टेटस हा पर्याय निवडा.
4) येथे एक नवीन विंडो ओपन होईल ज्यावर बँक सीडिंग स्टेटस हा पर्याय देखील दिसेल.
5) त्यावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड टाकून लॉगिन करा.
6) आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून लॉगिन करा.
7) लॉगिन केल्यानंतर बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या आधार क्रमांकाशी कोणते बँक खाते लिंक आहे हे लगेच समजेल.