नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारतर्फे सुरु करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळवत आहे. या योजनेच्या सुरूवातीपासूनच, प्रत्येक जिल्ह्यातून, गावातून आणि शहरातून मोठ्या प्रमाणात फॉर्म भरले गेले आहेत. आता पात्र लाभार्थ्यांची यादी विविध स्तरांवर जसे की जिल्हा, महानगरपालिका, ग्रामपंचायत इत्यादींवर प्रकाशित केली जात आहे.
मित्रानो विशेष म्हणजे धुळे महानगरपालिकेने या योजनेची पहिली तात्पुरती लाभार्थी यादी जाहीर केली आहे. सध्या या यादीसाठी साइटवर ट्रॅफिक खूप वाढल्यामुळे तांत्रिक अडचणी येत आहेत. कृपया काही वेळाने साइट रिफ्रेश करून किंवा थोड्या वेळानंतर पुन्हा चेक करून पहा. या साइटवर सध्या फक्त धुळे महानगरपालिकेतील लाभार्थ्यांची यादी उपलब्ध आहे.
लाडकी बहीण योजना दुसरी यादी जाहीर
आगामी काळात हळूहळू प्रत्येक जिल्ह्याची लाभार्थी यादी प्रकाशित होईल. ज्या जिल्ह्यांच्या यादी आपल्याला उपलब्ध होतील, त्या सर्व आपल्या वेबसाईटवर किंवा व्हाट्सअप ग्रुपवर पाहायला मिळतील. सध्या धुळे जिल्ह्याची यादी जाहीर झाली आहे.
लवकरच इतर जिल्ह्यांच्या, महानगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत अशा विविध स्थानिक संस्थांच्या यादी देखील जाहीर होतील.
Pl share details of 2nd list of ladki bahin yojna