नमस्कार, आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून पैसे आपल्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत की नाही हे कसे तपासावे याबद्दल सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय : राशन मध्ये तांदूळ ऐवजी मिळणार या ५ वस्तू ……
मित्रांनो सध्या राज्यभर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) चांगलीच चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 14 ऑगस्ट 2024 पासून लाभ मिळायला चालु झाली आहे. काही महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळाले आहेत. तसेच सप्टेंबर महिन्यातही काही महिलांना या योजनेचे पैसे मिळणार आहेत. पण अनेकांना हे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झाले की नाही हे तपासण्याची आवश्यकता भासू शकते. चला तर मग मित्रानो जाणुन घेऊयात या योजनेचा लाभ आपल्याला मिळाला आहे की नाही हे कसे तपासावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे कसे तपासावेत?
1) कस्टमर केअर कॉल
मित्रानो तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला फोन लावून सुद्धा तुम्ही तुमच्या खात्यात जमा झालेली रक्कम विचारू शकता.
लाडक्या बहिणींना मोठा धक्का ! सप्टेंबरपासून नोंदणी केल्यास २ महिन्याचे पैसे नाही मिळणार
2) ऑनलाईन बँकिंग/बँक एप
ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या एपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करा. त्यावरून तुम्हाला पैसे जमा झाले आहेत की नाही हे सहज रित्या कळू शकेल.
3) मोबाईल मेसेज
पैसे जमा झाल्यावर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बँकेकडून मेसेज येतो. हा मेसेज आला आहे की नाही हे तपासा.
4) प्रत्यक्ष बँकेत भेट
मित्रानो तुम्ही ऑनलाईन बँकिंग सेवा उपलब्ध नसल्यास, तुम्ही प्रत्यक्ष बँकेत मध्ये जाऊन सुध्दा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तपासू शकता.