नमस्कार मित्रांनो राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या योजनेंतर्गत, राज्य सरकारने तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी ३ हजार रुपये जमा केले आहेत. १४ ऑगस्टच्या संध्याकाळपासून या रकमेचे जमा होणे सुरू झाले होते.
ज्या महिलांच्या खात्यात अद्याप ३ हजार रुपये जमा झालेले नाहीत, त्यांनी आपले बँक खाते आधार कार्डाशी जोडण्याची आवश्यकता आहे. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या व मंजूर झालेल्या महिलांना १९ सप्टेंबर पासून त्यांचे पैसे मिळतील. कारण ५ दिवस बँकला सुट्टी असल्याने या महिन्यात पैसे थोडे उशिराने जमा होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय : सोयाबीन, कांदा उत्पादकांना मोठा दिलासा …
सध्या १९ सप्टेंबर हि तारीख सांगण्यात येत आहे, पण हि तारीख सुद्धा पुढे ढकलण्यात येऊ शकते. कारण अजूनही पूर्णपणे अर्जाची पडताळणी झालेली नाही. खूप जननी अजूनही केवायसी केलेली नाही.
सुरुवातीला ८० लाख महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा करण्यात आले होते, त्यानंतर आज आणखी १६ लाख पात्र महिलांना हा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
मित्रानो आदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. १४ ऑगस्टच्या सकाळपासून १६ लाख ३५ हजार महिलांच्या खात्यांमध्ये ३ हजार रुपयांचा लाभ जमा झाला होता. यापूर्वी ८० लाख महिलांना थेट लाभ मिळाला होता.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार रु.५ लाखापर्यंत अनुदान, असा करा अर्ज..
एकूण ९६ लाख ३५ हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याची पुष्टी करण्यात आली आहे, आणि उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळेल, यासाठी महिला व बालकल्याण विभाग अथक प्रयत्न करत आहे.
तसेच या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर असल्याचे सुरुवातीला सांगितले गेले होते, परंतु आदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे की, अर्ज प्रक्रियेसाठी कोणतीही अंतिम तारीख नाही. त्यामुळे ३० सप्टेंबर नंतरही महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येईल.