महाराष्ट्र राज्यामध्ये शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो आणि शेती करत असताना विविध अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते आणि त्यामुळे अशा परिस्थितीपासून शेतकऱ्यांचे रक्षण व्हावे आणि शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासन वेळोवेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेत असते आणि अशातच 12 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अधिकृत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे.
राज्य सरकारची मोठी घोषणा : शेतकऱ्यांना मिळणार ४० हजार रुपये नुकसान भरपाई ….
राज्य शासनाच्या वतीने कीड रोग सर्वेक्षण आणि सल्ला योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महत्त्वाच्या पिकांवरील किडींवर नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि त्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती ज्यामधील आता 15 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून परवानगी देण्यात आलेली आहे.
कृषी आयुक्तालय पुणे यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या प्रस्तावाला अनुसरून हा निधी देण्याची बाब सरकारच्या विचारधीन होती आणि त्याच अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून हा अधिकृत शासन निर्णय जाहीर केला गेला आहे.
कीड रोग सर्वेक्षण आणि सल्ला योजनांमध्ये भात, सोयाबीन, तूर, कापूस, मका, ज्वारी, ऊस, हरभरा तसेच फळ पिकांमध्ये डाळिंब, आंबा, केळी, मोसंबी, चिकू, संत्रा, काजू, भेंडी व टोमॅटो या पिकांवरील कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय : मुलगी असेल तर मिळेल १ लाख रुपये……
या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित पद्धतीने व्हावी आणि खर्चा वरती नियंत्रण राहून निर्धारित केलेल्या राशीमध्ये योजना पार पाडावी याची जबाबदारी कृषी आयुक्त यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे. तसेच कृषी आयुक्त यांच्या माध्यमातून योजना पार पाडल्यानंतर खर्चाचे परिपत्रक राज्य शासनाकडे पाठवावे असे निर्देश देण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र शासनाची ही कीड रोग व्यवस्थापनाची योजना शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायद्याची आहे आणि त्या माध्यमातून शेती वरती उद्भवणाऱ्या विविध कीड आणि रोग वरती नियंत्रण ठेवले जाईल तसेच त्या अनुषंगाने शेती उत्पन्न वाढीस लागेल.