या शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा होणार १० हजार रुपये अनुदान, जिल्हानिहाय यादी येथे पहा …..

नमस्कार शेतकरी मित्रांनोकापूस आणि सोयाबीन अनुदानाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे की, हे अनुदान १० सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले जाईल. अनुदान वितरणातील अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी आज एक विशेष बैठक घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. पण पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात अजूनही काही अडचणी येत असल्याचे समजते.

मित्रांनो सरकारने ३० ऑगस्ट रोजी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरणाच्या कार्यपद्धतीची घोषणा केली होती, परंतु काही तांत्रिक अडचणी अद्याप कायम आहेत. या अडचणींचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्र्यांनी आज कृषी विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, मित्रांनो तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हानिहाय यादी येथे पहा

२०२३ च्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना २ हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी हेक्टरी ५,००० रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण ४,१९४ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे, ज्यामध्ये कापूस उत्पादकांसाठी १,५४८ कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादकांसाठी २,६४६ कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. चला तर मग मित्रांनो ही माहिती इतर शेतकऱ्यांना नक्की पाठवा.

Leave a Comment