जर राज्यातील शेतकऱ्यांनी काही कारणामुळे ई-पीक पाहणी केली नसेल तर राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा ई पीक पाहणी करण्याची संधी देण्यात आली आहे. रविवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी संपणाऱ्या ई-पीक पाहणीला आता ८ दिवसांची मुदत वाढ राज्य शासनाच्या मार्फत देण्यात आली आहे. ई पीक पाहणीची अंतिम तारीख २३ सप्टेंबरपर्यंत असून आता ई-पीक पाहणी इंटरनेटशिवाय सुद्धा करता येईल.
खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ , नवीन दर जाहीर
ई-पिक पाहणीला मुदतवाढ जाहीर
खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये ई पीक पाहणी नोंद करण्यासाठी राज्याच्या महसूल विभागाने दि. १ ऑगस्टपासून राज्यात सुरुवात केली होती. पण अवकाळी पाऊस, सततच्या शासकीय सुट्ट्या, वीज पुरवठ्यासह तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करणे शक्य झाले नाही. अशाच परिस्थिती मध्ये ई-पिक पाहणी करण्याची अंतिम मुदत ही १५ सप्टेंबर होती. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यातून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
परंतु आता राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. राज्य शासनाने शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंद केलेली नाही, अशा शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी आता करता येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींना दिलासा ,तिसरा हप्ता या दिवशी होणार जमा
ई पीक पाहणीला तलाठी स्तरावर सुद्धा मुदतवाढ जाहीर
यासोबतच, राज्य सरकारने तलाठी स्तरावर देखील पुन्हा मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. आता तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी तपासणीला मुदत वाढ जाहीर केली आहे. आता २४ सप्टेंबर ते २३ ऑक्टोंबर या कालावधीमध्ये कृषीसहाय्यक व तलाठी पीकपाहणी करू शकणार आहेत.