नमस्कार शेतकरी मित्रांनो पोळ्याच्या अमावस्येचा व कापूस फवारणीचा एक जुना व महत्त्वाचा संबंध आहे. कापसाच्या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव जर झाला तर कापूस पिकात 40 ते 50 टक्के पर्यंत नुकसान होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी पोळ्याच्या अमावस्येला फवारणी करणे महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे पुढील संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते. शेतकरी मित्रांनो आपण या लेखा मध्ये पोळ्याच्या अमावस्येलाच फवारणी का करावी? यामागील शास्त्रीय कारणांवर जाणून घेऊया.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय : राशन मध्ये तांदूळ ऐवजी मिळणार या ५ वस्तू ……
अमावस्येचे व कापूस फवारणीचे संबंध काय आहे?
मित्रांनो सध्याला अनेक शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न येतो की पोळ्याच्या अमावस्येलाच फवारणी का करावी? त्याचे उत्तर शास्त्रीय कारणांमध्ये दडलेले आहे. कापसाच्या पिकाला पाते, फुलधारणा होत असताना, लवकर लागवड केलेल्या पिकांना बोंडे देखील लागतात. या अवस्थेत बोंडअळीचा प्रादुर्भाव पिकावर वाढू लागतो. बोंडअळीचे पतंग अमावस्येच्या काळोख्या रात्री अंडी घालतात मित्रानो यामुळे दोन ते तीन दिवसांत अळी बाहेर पडते. म्हणून अमावस्येच्या आधी किवा नंतर दोन दिवसांत अंडीनाशक किटकनाशकाची फवारणी करणे महत्त्वाचे असते.
पोळा अमावस्या व कापूस फवारणी
बोंडअळीचे अंडी नष्ट करण्याकरीता प्रोफेनोफॉस 40% व सायपरमेथ्रिन 4% घटक असलेल्या कोणती कंपनी असू द्या त्या कंपनीच्या किटकनाशकाचा वापर तुम्ही करू शकता मित्रांनो याबरोबरच पातेगळ होऊ नये या करिता म्हणून बुरशीनाशक व पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम दर्जाचे टॉनिक वापरावे. पातेधारणा कमी असल्यास 12-60-00 या विद्राव्य खताचा वापर देखील गरजेचे आहे.
लाडक्या बहिणींना मोठा धक्का ! सप्टेंबरपासून नोंदणी केल्यास २ महिन्याचे पैसे नाही मिळणार
फवारणी करताना घ्यावयाची काळजी
1) फवारणीचे उत्तम परिणाम मिळवण्यासाठी सिलिकॉन बेस स्टिकरचा वापर करावा.
2) पावसाचे किंवा खूप दिवसांपासून साठवलेले पाणी फवारणीसाठी वापरू नये; त्याऐवजी स्वच्छ पाण्याचा वापर करावा.
3) कंपनीने सुचवलेल्या प्रमाणातच औषध वापरावे, प्रमाण कमी-जास्त करू नये.
4) किटकनाशकाच्या डब्यावर दिलेले लेबल काळजीपूर्वक वाचावे.
5) कृषी सेवा केंद्र चालकाचा सल्ला नक्की घ्यावा.
शेतकरी मित्रांनो या शास्त्रीय कारणांमुळे पोळ्याच्या अमावस्येला फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे मानतात. यामुळे आपल्या शेतातील कापूस पिकाचे संरक्षण करता येते व नुकसान कळू शकतो. शेतकरी मित्रांनो ही माहिती तुमच्या गावातील इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ होईल.