महाराष्ट्रातील लाखो नागरिक ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालवत आहेत आणि अशा व्यवसायिकांसाठी राज्य शासनाच्या वतीने 16 मार्च 2024 रोजी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली. रिक्षा चालकांसाठी आणि मीटर टॅक्सी चालवणाऱ्या व्यक्तींसाठी हे मंडळ कार्य करेल आणि या अंतर्गत रिक्षा तसेच टॅक्सी चालवणाऱ्या व्यक्तींना विविध सुविधा प्रदान केल्या जातील तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ सदर नागरिकांना मिळावा, यासाठी प्रयत्न केले जातील.
धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी कल्याणकारी मंडळाची स्थापना झाल्यानंतर आता 10 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाच्या वतीने अधिकृत शासन निर्णय प्रारित करून राज्य शासनाच्या परिवहन विभाग अंतर्गत 50 कोटी रुपयांचा निधी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजूर केल्याची घोषणा करण्यात आलेली आहे.
या महिलांना मिळेल फ्री शिलाई मशीन, आजच अर्ज करा….
राज्य शासनाचे वतीने वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राज्यातील तळागाळातील नागरिकांसाठी राबविण्यात येतात आणि त्यातच ऑटो रिक्षा तसेच मीटर टॅक्सी रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तींना विविध योजनांचा लाभ सुलभपणे प्राप्त व्हावा तसेच सदर मंडळ परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही 50 कोटी रुपयांची एक रकमी अनुदानाची घोषणा करण्यात आलेली आहे.
अनुदान यादी जाहीर …
राज्य शासनाच्या वतीने ही रक्कम धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी कल्याणकारी मंडळासाठी व्यवस्थित पद्धतीने उपलब्ध व्हावी आणि यामध्ये पारदर्शकता असावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त यांना मुख्य नियंत्रण अधिकारी तसेच वित्त आणि लेखा अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.