सरकारतर्फे या शेतकऱ्यांना मिळेल २ लाखापर्यंत नुकसान भरपाई, नवीन GR आला

महाराष्ट्र राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत आणि याच अंतर्गत शासनामार्फत शेतकऱ्यांना विविध अपघातांपासून विमा संरक्षण मिळावे यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यात येते. विविध नैसर्गिक तसेच नैसर्गिक घटकांपासून शेतकऱ्यांना विमा संरक्षण प्रदान करण्याचे काम ही योजना करते.

राज्य शासनामार्फत गोपीनाथ मुुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची यशस्वी अंमलबजावणी केली जात आहे आणि आता 9 सप्टेंबर 2024 रोजी याविषयीचा अधिकृत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये 2024-25 मध्ये विविध अपघातग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी अनुदान निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

या तरुणांना मिळेल महिन्याला १० हजार रुपये, असा करा अर्ज ……..

सदर शासन निर्णयामध्ये गोपीनाथ मुुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणजेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये चालू आर्थिक वर्षातील तरतुदीनुसार 30 कोटी रुपयांचे अनुदान निधी वितरित करण्यास कृषी आयुक्त यांना परवानगी देण्यात आलेली आहे.

गोपीनाथ मुंडे अपघात विमा GR

सदर योजनेअंतर्गत यापूर्वी 2023-24 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावासाठी 25.72 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला होता आणि आता चालू वर्षातील 2024-25 मध्ये विविध अपघातग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनामार्फत परवानगी देण्यात आलेली आहे.

अपघात विमा फॉर्म भरा

गोपीनाथ मुुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची यशस्वी अंमलबजावणी व्हावी यासाठी आयुक्तालय स्तरावरती कृषी आयुक्त यांना मुख्य नियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालक यांना संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तसेच जिल्हास्तरावरती कृषी अधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी यांना या योजनेची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.

Leave a Comment