आधारकार्ड बद्दल मोठी घोषणा : या तारखेपर्यंत करा अपडेट अन्यथा भरावा लागेल दंड………

जे आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी बनवण्यात आलेले आहेत असे आधार कार्ड अपडेट करणे महत्त्वाचे आहे आणि आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबर 2024 ही शेवटची दिनांक ठेवण्यात आलेली होती आणि आता त्यामध्ये यूआयडीएआय च्या माध्यमातून मुदतवाढ करण्यात आलेली आहे.

ऑनलाईन अपडेट करा

जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी बनवण्यात आलेले असेल आणि ते अद्याप अपडेट करण्यात आलेले नसेल तर तुम्ही ते 14 डिसेंबर 2024 पर्यंत अपडेट करू शकाल आणि त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. परंतु तुम्हाला मोफत आधार अपडेट करण्यासाठी पोर्टलवरूनच संबंधित आधार अपडेट प्रक्रिया पार पाडावी लागेल.

या शेतकऱ्यांना मिळेल त्वरित कृषी पंप, असा करा अर्ज …..

जर तुम्ही 14 डिसेंबर 2024 पर्यंत आधार कार्ड अपडेट करू शकले नाही तर तुम्हाला त्यानंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल. तसेच जर तुम्हाला इतर कारणास्तव आधार मध्ये काही अपडेट करायचे असेल आणि त्यासाठी आधार केंद्र वरती जाऊन हे अपडेट करावे लागत असतील तर त्यासाठी निर्धारित शुल्क द्यावे लागेल.

घरबसल्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्ही myAadhaar Portal वरील पुढील प्रोसेस चा वापर करू शकाल

  • सर्वप्रथम आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा – https://uidai.gov.in/
  • होम पेज वरील माय आधार पोर्टल वरती जाऊन ओटीपी तसेच आधार क्रमांकाच्या माध्यमातून लॉगिन प्रक्रिया पार पाडा
  • आपली आधार संबंधित सर्व माहिती तपासून बघा
  • जर तुमचा रहिवासी पत्ता चुकीचा असेल तर तुम्ही त्यासाठी योग्य दस्तावेज अपलोड करा
  • निर्धारित फॉर्मेट मध्ये आधार कार्ड डॉक्युमेंट अपलोड करून आधार अपडेट प्रक्रिया पूर्ण करा

आधार पोर्टलवरून मोफत आधार कार्ड अपडेट होत असले तरी काही कारणास्तव आपल्याला आधार केंद्र वरती जावेच लागेल जसे की आपले बायोमेट्रिक डेटा अपडेट करायचे असेल किंवा इतर फिजिकल डेटा द्यावा लागत असेल तर त्यासाठी आधार केंद्रावर जावे लागेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा : माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे रु.४५०० आज होणार जमा …………

Leave a Comment