या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीची नुकसान भरपाई , नवीन यादी जाहीर….

नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३०७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी वाटप करण्यास मंजुरी दिली आहे. नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी (ता. ५) शासनाने या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला.

SBI खातेदारांना मिळणार 11000 रुपये , जाणून घ्या सविस्तर माहिती

नैसर्गिक आपत्तींमध्ये जसे की अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ, शेती पिकांचं नुकसान झाल्यास सरकार निविष्ठा अनुदान स्वरूपात पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना मदत करते. याआधीही नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अनुक्रमे १४४ कोटी आणि २१०९ कोटी रुपयांची मदत दिली होती. तसेच, जानेवारी ते मे २०२४ या काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५९६ कोटी रुपयांचा मदत निधी वितरित करण्यात आला होता.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणखी मदत मिळावी म्हणून विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या आधारावर राज्य सरकारने आता ३०७ कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे.

या २६ जिल्ह्यांचा समावेश

मित्रानो या निर्णयाचा फायदा कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, वर्धा ,जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, तसेच कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

अतिवृष्टीची नुकसान भरपाई , नवीन यादी जाहीर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती, जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३ हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे. ही मदत लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर डीबीटी (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर) पोर्टलच्या माध्यमातून जमा करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

मित्रानो अतिवृष्टीच्या मदतीच्या मुद्द्यावर पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला विरोधकांनी जोरदार लक्ष्य केलं होतं. विरोधकांनी सरकारवर वेळेत मदत न करण्याचा आरोप केला होता. पणमित्रअनो या निर्णयाने सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत दिली आहे.

Leave a Comment