नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना घरबसल्या रोजगाराचे साधन मिळावे या उद्देशाने सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेत अर्ज करणाऱ्या नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
राशनकार्ड धारकांना मोठा धक्का , आता राशनदुकानात तांदूळ ऐवजी मिळेल या वस्तू
योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते, ज्यात कौशल्यविकासावर भर दिला जातो. प्रशिक्षण कालावधीत सहभागी नागरिकांना दररोज ₹500 चा भत्ता दिला जातो. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर, लाभार्थ्यांना कौशल्य प्रमाणपत्र देखील प्रदान केले जाते.
या योजनेद्वारे प्रशिक्षण केंद्रांमध्ये लाभार्थ्यांना संबंधित कौशल्य शिकवले जाते आणि त्यांच्या कामातील गुणवत्ता वाढवली जाते. प्रशिक्षणानंतर, सरकारकडून त्यांच्या बँक खात्यात ₹15,000 ची प्रोत्साहन रक्कम दिली जाते, ज्याचा उपयोग शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो.
ई-पिक पाहणीला मुदतवाढ जाहीर: ई-पिक पाहणीला 8 दिवसांची मुदत वाढ
प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी, इच्छुकांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
1) सर्वप्रथम, योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि ऑनलाइन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
2) अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक माहिती आणि कागदपत्रे भरावीत.
आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड किंवा मतदार ओळखपत्र,आय प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र (जन्म प्रमाणपत्र, शाळा प्रमाणपत्र), पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाइल नंबर,बँक खाते तपशील,जात प्रमाणपत्र (जर लागू असेल),विधवा प्रमाणपत्र (जर लागू असेल),विकलांगता प्रमाणपत्र (जर लागू असेल)
अधिकृत वेबसाईट | वेबसाईट |
अर्ज कसा भरावा | पीडीएफ फाईल |
शिलाई मशीन यादी | यादी पहा |
Whatsapp Channel | Whatsapp Channel |
अर्ज सादर केल्यानंतर, काही दिवसांत त्याची प्रक्रिया पूर्ण होईल. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला ‘विश्वकर्मा’ म्हणून नोंदणी केली जाईल. नोंदणीनंतर 5 ते 15 दिवसांच्या मोफत प्रशिक्षणाचा लाभ तुम्ही घेऊ शकता, ज्यासाठी दररोज ₹500 चा भत्ता दिला जाईल.
पीडीएफ फॉर्म डाऊनलोड करा
मित्रानो प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ₹15,000 मिळतील, ज्याचा वापर तुम्ही शिलाई मशीन खरेदीसाठी करू शकता. त्याचबरोबर, तुम्हाला ₹2 ते ₹3 लाखांपर्यंत कर्ज सुविधा देखील मिळू शकते.