खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ , नवीन दर जाहीर

edible oil increase नमस्कार मित्रानो गणपती उत्सव आणि ईद-ए-मिलाद यांसारख्या उत्सवांच्या काळात, खाद्यतेलांच्या किंमतीत झालेली मोठी वाढ सामान्य नागरिकांसाठी मोठा धक्का ठरली आहे. सरकारने कच्च्या तेलावर आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवले असले तरी, खाद्यतेलांच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे. नवीन माहितीनुसार खाद्यतेलांच्या प्रति किलो किंमत 20 ते 25 रुपयांनी वाढली आहे.

राशनकार्ड धारकांसाठी मोठी सूचना : या राशनकार्ड धारकांना १ नोव्हेंबर पासून धान्य मिळणार नाही …

या परिस्थितीमुळे गणपती उत्सव आणि ईद-ए-मिलादसारख्या महत्त्वपूर्ण सणांच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आयात शुल्कात वाढ केली असली तरी, त्याचा त्वरित प्रभाव खाद्यतेलांच्या किंमतीवर दिसून आला आहे.

खाद्यतेलांच्या नवीन दरानुसार

सोयाबीन तेल: पूर्वीचा दर 110 रुपये प्रति किलो, आता 130 रुपये.

शेंगदाणे तेल – पूर्वीचा दर 175 रुपये प्रति किलो, आता 195 रुपये.

सूर्यफूल तेल – पूर्वीचा दर 120 रुपये प्रति किलो, आता 140 रुपये.

आताची मोठी बातमी : या तारखेला जमा होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे …..

मित्रानो सोयाबीन तेलाच्या किंमतीत वाढ करण्याच्या मागणीला अनुसरून, केंद्र सरकारने आयात शुल्क 20 टक्क्यांपर्यंत वाढवले. तसेच रिफाइंड सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावर आयात शुल्क 13.75 टक्क्यांवरून 35.75 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. यामुळे खाद्यतेलांच्या किंमतीत झालेली वाढ आणि सोयाबीन तेलाच्या किंमतीत सुधारणा केल्यामुळे नागरिकांचे बजेट तडफडणार आहे.

Leave a Comment