शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय : सोयाबीन, कांदा उत्पादकांना मोठा दिलासा …

नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. विशेषता सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी दिलासा देणारी बातमी आहे. शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनासाठी हमीभावापेक्षा कमी किमतीवर माल विकावा लागत होता, परंतु आता या संकटातून त्यांना काही प्रमाणात मुक्ती मिळेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा : माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे रु.४५०० आज होणार जमा …………

सोयाबीन आणि कांद्याच्या बाजारभावाची परिस्थिती

मित्रानो मागील दोन वर्षांत म्हणजे 2022 आणि 2023 या काळात सोयाबीन आणि कांद्याला बाजारात फारच कमी दर मिळाला. विशेषता सोयाबीन हमीभावापेक्षा खूपच कमी दराने विकले गेले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपयांचा दर द्यावा, अशी मागणी केली होती. राज्यातील कृषी विभागाने, कृषी मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विषयाचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे मोठा दिलासा

केंद्राचे कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडेही शेतकऱ्यांच्या मागण्या पोहोचविण्यात आल्या होत्या. त्यांनी सोयाबीन, कापूस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही दिली होती.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार रु.५ लाखापर्यंत अनुदान, असा करा अर्ज..

राजकीय पार्श्वभूमी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न

मित्रानो सध्या निवडणुकांचा कालावधी काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नाराज करणे सरकारला परवडणारे नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मागील काही काळात झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची गरज होती, जी अद्याप दिली गेलेली नाही. यामुळे मागील लोकसभा निवडणुकीत सरकारला मोठा फटका बसला, आणि जर परिस्थिती अशीच राहिली तर आगामी विधानसभा निवडणुकांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

केंद्र सरकारचा दिलासा – सोयाबीन व कांदा खरेदी निर्णय

महाराष्ट्र, तेलंगणा, आणि कर्नाटक या राज्यांमध्ये केंद्र सरकारने 90 दिवसांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) म्हणजेच 4892 रुपये दराने सोयाबीन खरेदी करण्याची मंजुरी दिली आहे. तसेच, मध्य प्रदेश सरकारनेही सोयाबीन हमीभावावर खरेदी करण्याची मागणी केली होती, जी केंद्र सरकारने मंजूर केली आहे.

बाजारभाव जाणून घेण्यासाठी येथे क्लीक करा

सोयाबीन दरवाढीसाठी आयात शुल्क वाढ

मित्रानो केंद्र सरकारने बाहेरील देशांतून आयात होणाऱ्या खाद्यतेलावर 20% आयात शुल्क लावले आहे, ज्यामुळे आता बाहेरील देशातून होणारी खाद्यतेलाची आयात कमी होईल. परिणामी देशांतर्गत सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि खरेदी होईल, ज्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment