मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेतून शेतकऱ्यांना त्वरित कृषी पंप वितरित करण्याची योजना सुरू झालेली आहे आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे कृषी पंपासाठी वाट बघावी लागत होती, अशा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर कृषी पंपातून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त विजेची विक्री करून शेतकरी काही उत्पन्न कमवू शकतील अशी माहिती दिली आहे.
मागेल त्याला सौर कृषीपंप या योजनेमध्ये जे शेतकरी पात्र आहेत अशा लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणाच्या माध्यमातून नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या वेबसाईटचे मुंबई येथे उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सदर माहिती देण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा : माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे रु.४५०० आज होणार जमा …………
महाराष्ट्र शासनाच्या या नाविन्यपूर्ण योजनेसाठी ऊर्जा विभागाचे अप्पर सचिव तसेच महावितरण अध्यक्ष आणि इतर मान्यवर उपस्थित होते. जे शेतकरी सौर कृषी पंप योजनेमध्ये पात्र आहेत असे शेतकरी तयार होणारी अतिरिक्त वीज, ग्रीड मध्ये पाठवून त्यातून उत्पन्न मिळू शकतील आणि त्यामुळे वीज बिल भरणारा शेतकरी हा विजेपासून उत्पन्न मिळवणारा शेतकरी बनू शकेल.
शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सौर कृषी पंप योजना राबवण्यात येते आणि यामध्ये नागरिकांसाठी 90% पर्यंत सबसिडी प्रदान करण्यात येते आणि जे शेतकरी या योजनेमध्ये पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना यामुळे पुढील 25 वर्ष फायदा होऊ शकतो.
घरगुती गॅस सिलेंडर झाले स्वस्त , येथे पहा आजचा नवीन दर ……
केंद्र शासनाच्या कुसुम योजनेच्या आधारे राज्यांमध्ये सौर कृषी पंप योजना राबवण्यात येते आणि या योजनेचा महाराष्ट्रातील तळागाळातील नागरिकांना लाभ व्हावा यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत तसेच आता सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त होणारी वीज विक्री करण्यास परवानगी मिळाल्यामुळे यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल.