गुगल पे देणार १ लाख रुपयापर्यंत वैयक्तिक कर्ज, असा करा अर्ज ….

मंडळी जीवनात असे क्षण येतात जेव्हा अचानक पैशांची गरज भासते. अशा वेळी वैयक्तिक कर्ज घेणे एक व्यवहार्य पर्याय ठरू शकतो. जर तुम्ही Google Pay वापरकर्ता असाल आणि तत्काळ रक्कम हवी असेल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आता Google Pay द्वारे एका क्लिकवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यासोबतच, तुमचा CIBIL स्कोअर चांगला असेल तर तुम्ही फक्त 10 मिनिटांत Google Pay द्वारे कर्ज मिळवू शकता.

मित्रानो हे कर्ज सुलभतेने मिळण्यासाठी Google Pay ने DMI Finance Limited सोबत भागीदारी केली आहे. DMI Finance एक डिजिटल आर्थिक सेवा देणारी कंपनी आहे जी फास्ट आणि सोयीस्कर पद्धतीने वैयक्तिक कर्ज देण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. या माध्यमातून ग्राहक 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज घेऊ शकतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा : माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे रु.४५०० आज होणार जमा …………

Google Pay वैयक्तिक कर्ज – मुख्य वैशिष्ट्ये

Google Pay ने अलीकडेच आपल्या पेमेंट ॲपमध्ये वैयक्तिक कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे कर्ज DMI Finance द्वारे दिले जाते. DMI ही एक खाजगी आर्थिक कंपनी आहे जी व्यवसाय व इतर वैयक्तिक गरजांसाठी कर्ज उपलब्ध करून देते.

यासाठी कोणत्याही बँकेत किंवा शाखेत जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलवरून Google Pay अ‍ॅप वापरून कर्जासाठी अर्ज करू शकता. यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

या योजनेद्वारे सरकार देणार आहे घर बांधण्यासाठी अनुदान , पात्रता चेक करा….

वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी पात्रता

अर्जदार भारताचा मूळ किंवा कायमचा रहिवासी असावा.
CIBIL स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असावा.
अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे असावे.
अर्जदाराचे बँक खाते चालू असावे.

आवश्यक कागदपत्रे

Google Pay वरून कर्ज घेण्यासाठी फक्त काही मोजकीच कागदपत्रे आवश्यक आहेत जसे की आधार कार्ड,पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा (पासबुक, वीज बिल),पासपोर्ट साईझ फोटो

loan

कर्ज मिळवण्याची प्रक्रिया

1) सर्वप्रथम तुमच्या फोनवर Google Pay अ‍ॅप डाउनलोड करा व लॉगिन करा.

2) Google Pay अ‍ॅपमधील वैयक्तिक कर्ज (Personal Loan) पर्याय निवडा.

3) अर्जातील आवश्यक माहिती भरा, जसे की तुमचे वैयक्तिक तपशील व कर्जाची रक्कम.

4) तुम्हाला किती कालावधीसाठी कर्ज हवे आहे ते निवडा (जास्तीत जास्त 36 महिने).

5) आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.

6) अर्ज पूर्ण केल्यानंतर, DMI Finance आणि Google द्वारे कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

7) मंजुरी मिळाल्यानंतर कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

Google Pay द्वारे दिलेले कर्ज वेगवान आणि सोयीस्कर आहे, आणि त्यासाठी कमी कागदपत्रांची गरज असल्यामुळे तुम्ही सहजपणे व जलद वेळेत तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकता.

असा करा अर्ज

Leave a Comment