मंडळी आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहे ज्यामध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. या संदर्भात अनेक महिलांना अर्जाची अंतिम मुदत संपत आहे का हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मित्रांनो आपल्या राज्य सरकारने सुरुवातीला 31 ऑगस्ट ही अर्ज करण्याची अंतिम तारीख दिलेली होती पण मित्रांनो नंतर मुदत वाढवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे अर्जाची खऱ्या अंतिम तारीख काय आहे यावर अनेक महिलांना प्रश्न पडला आहे. चला तर मित्रांनो जाणून घेऊया या लेखात याबद्दल सविस्तर माहिती.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
या शेतकऱ्यांना मिळणार २०,००० रुपये, नवीन GR पहा
मित्रांनो आपल्या मुख्यमंत्र्यांनी या योजनेची घोषणा केल्यानंतर आपल्या सरकारने 31 जुलै ही अंतिम मुदत दिली होती. पण कागदपत्रांची जमवाजमव आणि सरकारी कार्यालयांमधील गर्दी पाहता सरकारने अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली गेली होती. त्यानंतर ऑगस्टच्या मध्यात देखील मुदतवाढ देण्याची बातमी आली होती पण नेमकी तारीख जाहीर केलेली नव्हती मित्रांनो या कारणामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता 31 ऑगस्ट जवळ येत असताना महिलांवर्गात चिंतेच वातावरण आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की 31 ऑगस्टची मुदत ही अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख न्हवे. अर्जाची प्रक्रिया सतत चालू राहील व शेवटची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे महिलांना अर्ज सादर करण्याकरीता असल्याबद्दल पुढील काळात कोणतीही अंतिम तारीख ठरलेली नाही यामुळे महिलांना चांगला दिलासा मिळाला आहे.
अर्जाची पडताळणी प्रक्रिया
मित्रांनो 31 जुलै नंतर सादर केलेल्या अर्जांची जिल्हास्तरावर पडताळणी चालु आहे. मान्यता प्राप्त आसलेल्या अर्जांचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे जमा झाला की तो लगेचच तो बँककडे पाठवला जाईल. ही जी प्रक्रिया अत्यंत जलद गतीने चालू आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. यामुळे महिलांना त्यांच्या अर्जाच्या मंजुरीसाठी मेसेज मिळतील व सप्टेंबर मध्ये त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची अपेक्षा आहे. या कारणामुळे आता महिलांनी अर्ज मंजूर झाला आहे की नाही याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.