आता या महिलांना मिळेल रु.१५०० ऐवजी रु.३०००, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा ….

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी अर्ज सादर केलेले आहेत आणि जवळपास दीड कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये प्राप्त झालेले आहेत. राज्यातील करोड महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असताना विरोधकांकडून या योजनेवर टीका केली जात आहे.

निवडणुकीच्या काळामध्ये राज्यातील महिलांना आमिष दाखवले जात असून महिलांना सत्ताधारी पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी ही योजना चालवली जात आहे, अशी टीका विरोधकांच्या माध्यमातून केली जात आहे. या उलट सत्ताधारी पक्षाकडून ही योजना महिलांच्या कल्याणासाठी असल्याचे प्रतिपादन करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत नागरिकांना मिळेल २ लाखापर्यंत अनुदान, नवीन यादी पहा …..

परंतु काही दिवसांपूर्वी सांगलीच्या दौऱ्यावर असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लाडकी बहीण योजनेच्या पैशांमध्ये वाढ करणार असल्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर आता संजय राऊत यांनी दोन महिन्यानंतर त्यांचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये करणार असल्याची घोषणा केली.

संजय राऊत सध्या मराठवाडा दौऱ्यावरती आहेत आणि तिथे नांदेडमध्ये बोलत असताना त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या श्रेय वादावरून सरकार वरती टीकास्त्र सोडले आणि भाषणात त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभात दुप्पट वाढ करणार असल्याची माहिती दिली तसेच पंधराशे रुपयांमध्ये महिलांच्या सर्व समस्या सोडवता येणार नाहीत त्यासाठी लाभांमध्ये वाढ करणार असल्याची माहिती दिली.

या तारखेला मिळेल पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता, तारीख झाली निश्चित…..

राज्य शासनावर टीका करत असताना संजय राऊत राज्यांमधील बेरोजगारी, महागाई आणि इतर बाबींवरती चर्चा केली. दुसरीकडे राज्य शासनाकडून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि पुढील काही दिवसांमध्ये महिलांच्या बँक खात्यावरती हे पैसे वर्गीत केले जातील अशी माहिती दिली आहे.

Leave a Comment