नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारकडून गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी विविध योजनांचा अंमल केला जातो. यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना. या योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी ₹2000 चे आर्थिक सहाय्य दिले जाते. आतापर्यंत 17 हप्ते वितरित झाले आहेत आणि आता 18 व्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे.
18 व्या हप्त्याच्या वितरणाची नेमकी तारीख अद्याप सरकारकडून जाहीर झालेली नाही. मित्रानो PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरही हप्त्याच्या तारखेचा उल्लेख झालेला नाही. नियमाप्रमाणे प्रत्येक हप्ता चार महिन्यांच्या अंतराने दिला जातो आणि जून महिन्यात 17 वा हप्ता वितरित झाल्यामुळे 18 वा हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती उपलब्ध आहे.
नवीन यादी जाहीर
मित्रांनो जर हप्ता ऑक्टोबरमध्ये वितरित झाला, तर दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना हा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
PM Kisan 18th हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक गोष्टी
1) ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रक्रिया पूर्ण न झाल्यास लाभ मिळणार नाही.
2) तुमच्या भूमीचे सत्यापन झालेले असणे आवश्यक आहे.
3) आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे गरजेचे आहे.
शेतकरी मित्रांनो ही सर्व आवश्यक गोष्टी पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळेल.