पी एम किसान योजनेचे बँक खात्यात आले 8 हजार , नवीन यादी झाली जाहीर

मंडळी देशातील कोट्यवधी शेतकरी सध्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच हा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही सोप्या पद्धतीने आपले नाव लाभार्थी यादीत तपासू शकता.

पीएम किसान सन्मान निधी योजना

मित्रांनो केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात वर्षभरात 6,000 रुपये जमा केले जातात जे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. 2023 मध्ये जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16वा हप्ता जारी केला होता आणि आता शेतकरी 18व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

या शेतकऱ्यांना मिळेल प्रती हेक्टर ५ हजार रुपये, सरकारने नवीन शासन निर्णय केला जाहीर …….

लाभार्थी यादीत नाव कसे तपासावे ?

शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे नाव लाभार्थी खाली दिलेल्या माहितीप्रमाणे तपासू शकता.

1) शेतकरी मित्रांनो तुम्ही पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटला जावा https://pmkisan.gov.in/

2) Know Your Status वर क्लिक करा याठिकाणी तुम्ही नोंदणी क्रमांक टाकून तुमचे नाव यादीत तपासू शकता.

3) जर तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर Know your registration no या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरावा लागेल. तुम्हाला OTP प्राप्त होईल ज्याचा वापर करून नोंदणी क्रमांक काढता येईल.

4) लाभार्थी यादीतील नावे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाची माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्ही यादी डाउनलोड करू शकता.

नवीन यादी तपासा

पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक.

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पीएम किसान योजनेशी संबंधित कोणतीही अडचण येत असेल, तर तुम्ही पीएम किसान हेल्पलाइन 155261 क्रमांकावर संपर्क साधू शकता
मित्रांनो तुम्ही याशिवाय तुम्ही कोणत्याही समस्येसाठी पीएम किसान पोर्टलला सुद्धा भेट देऊ शकता.

Leave a Comment