धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा : १५ दिवसात शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा …….

शेतकरी मित्रानो मागील काही दिवसांत झालेल्या सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने पिकांचे सॅम्पल सर्व्हे विमा कंपनी व कृषी विभागाने संयुक्तरित्या ८ दिवसांत पूर्ण करून घ्यावे. त्यानंतर येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रीम पीकविमा मिळावा, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धंनजय मुंडे यांनी बैठकीत दिले आहेत.

राज्य सरकारचा मोठा निर्णय : मुलगी असेल तर मिळेल १ लाख रुपये……

अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मित्रानो जिल्हाधिकारी कार्यालयात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, ॲड. राजेश्वर चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर, आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह विमा कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.

पिक विमा यादी जाहीर

15 दिवसात शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम विमा भरपाई

याठिकाणी पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींना पुढील आठवडाभरात कृषी विभागाच्या सहकार्याने नमुना सर्वेक्षण करून त्याच्या पुढील १५ दिवसामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ देण्याबाबत सूचना केल्या आहेत.

पिकांचे सर्वेक्षण करताना कुठलीही चूक अथवा दुर्लक्ष विमा कंपनीकडून झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत, असेही निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या वेळी दिले. बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या सर्व महसूल मंडळातील नुकसानीच्या भरपाईचे नैसर्गिक आपत्ती अनुदान मागणीचे अहवाल राज्य शासनाकडे तत्काळ सादर करावेत, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

Leave a Comment