राज्य सरकारची मोठी घोषणा : शेतकऱ्यांना मिळणार ४० हजार रुपये नुकसान भरपाई ….

नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टी झाली, ज्यामुळे मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या भागांमध्ये ढगफुटीसारख्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. यामुळे शेती, घरे आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले. सध्या या नुकसानीची भरपाई देण्यासाठी पंचनामे सुरू आहेत.

राज्य सरकारने NDRF (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) च्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत जाहीर केली आहे. कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी 13,600 रुपये मदत देण्यात येणार आहे, जी तीन हेक्टरपर्यंत मर्यादित असेल. पूर्वी ही मदत फक्त 8,500 रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत असायची. आता पण या निकषांमध्ये बदल करून 13,600 रुपये प्रति हेक्टरी, तीन हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय : मुलगी असेल तर मिळेल १ लाख रुपये……

शेतकऱ्यांना 40,800 रुपये नुकसानभरपाई कशी मिळणार?

सरकारने जाहीर केलेल्या नव्या मदतीनुसार तीन हेक्टरपर्यंत शेत असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये मदत मिळेल. यामुळे एका शेतकऱ्याला एकूण 40,800 रुपये मिळू शकतात. या निर्णयामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बागायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी काय मदत?

जिरायती पिकांसाठी 13,600 रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर केली असली, तरी बागायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी कोणतीही मदत अद्याप घोषित झालेली नाही. या पिकांचे नुकसान झाले असूनही शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळणार की पूर्वीच्या निकषांनुसारच मदत दिली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

राज्य शासनाचा मोठा निर्णय : १५ सप्टेंबर ला शेतकऱ्यांच्या खात्यात येतील १० हजार रुपये, यादीत नाव चेक करा……

मित्रानो राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी म्हणून तीन हेक्टर मर्यादेत हेक्टरी 13,600 रुपये मदतीची घोषणा केली आहे. याबाबत राज्य सरकारने ट्विट करून ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवली आहे.

Leave a Comment