नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी विविध योजना राबवल्या जातात ज्यांचा उद्देश राज्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासाला गती देणे आहे. या योजनांमुळे महिलांना अधिकाधिक सुलभ आणि व्यापक सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न होत आहेत. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ नावाची एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेसंबंधी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. चला तर पाहूया या योजनेबाबतचा नवीन निर्णय.
राज्य सरकारचा नवीन निर्णय
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येत आहेत. तथापि, या योजनेत काही गैरप्रकार उघडकीस आले आहेत. सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने बनावट कागदपत्रांचा वापर करून पत्नीच्या नावावर 30 अर्ज सादर केले, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते, आणि त्या व्यक्तीच्या खात्यात पैसेही जमा झाले होते.
राज्य शासनाचा मोठा निर्णय : १५ सप्टेंबर ला शेतकऱ्यांच्या खात्यात येतील १० हजार रुपये, यादीत नाव चेक करा……
या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने या योजनेच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही, ज्यांना या योजनेत अर्ज करायचा आहे, त्यांच्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया उपलब्ध आहे.
असा करा अर्ज
मित्रानो जर तुम्हालाही माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करायचा असेल, तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्जाचा फॉर्म घ्या. तो फॉर्म व्यवस्थित भरून अंगणवाडी केंद्रात जमा करावा लागेल.
आवश्यक कागदपत्रे
तसेच राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून हा फॉर्म डाऊनलोड करू शकता. फॉर्म प्रिंट करून योग्यरीत्या भरावा आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या अंगणवाडी केंद्रात जमा करावा.