Electricity Bill Subsidy: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य शासन विविध योजना राबवत आहेत आणि या योजनांमध्ये नागरिकांना जास्तीत जास्त फायदा व्हावा असा शासनाचा कल असतो. विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून वेळोवेळी निधीची तरतूद करण्यात येत आहे आणि अशातच राज्य शासनाकडून कृषी पंप ग्राहकांना विज बिल सवलतीसाठी 42 कोटी रुपयांची वित्तीय राशी वितरणासाठी मंजूर करण्यात आलेली आहे.
27 जुलै 2024 च्या शासन निर्णयामध्ये अर्थसंकल्पातील निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवण्यात आली होती आणि एकूण 295 कोटी रुपये कृषी पंप ग्राहकांना वीज बिलात सवलत योजनेअंतर्गत अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेले आहेत आणि त्यामधीलच 42.15 कोटी रुपयांची रक्कम 10 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णय मध्ये जाहीर करून वितरित करण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे.
14 सप्टेंबर पर्यंत आधारकार्ड अपडेट करा, नाहीतर भरावा लागेल दंड ……….
राज्यातील अनुसूचित जाती घटकांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे आणि यामध्ये 115 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. तर पुरवणी मागणी द्वारे अतिरिक्त 180 कोटी रुपये म्हणजेच एकूण 295 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली गेली आहे.
महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव यांना सदर रक्कम वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने परवानगी देण्यात आलेली आहे. जाहीर केलेला निधी याच वर्षी खर्च करावा तसेच संबंधित खर्च काटकसरीने करावा तसेच खर्चाचा आढावा प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवावा असे निर्देश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेले आहे.
शासन निर्णय GR
झालेल्या खर्चावर सनियंत्रण ठेवता यावे यासाठी अनुसूचित जाती घटकांसाठी वितरित करण्यात आलेला निधी त्यांच्यासाठीच खर्च व्हावा अशी दक्षता घ्यावी असे शासन निर्णय मध्ये म्हटले गेले आहे. कृषी पंप ग्राहकांना वीज बिलामध्ये सवलत या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.