Aditi tatkare update 2024 : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर
पहिल्यांदा 80 लाख महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये पाठवण्यात आले होते. यानंतर आज सरकारने आणखी 16 लाख पात्र महिलांना लाभ दिला आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते.
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर
सद्यस्थितीत एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.
दरम्यान, या योजनेसाठी फक्त 31 ऑगस्टपर्यंतच अर्ज करता येतील, असे सांगितले जात होते. पण आदिती तटकरे यांनी याआधीच स्पष्ट केल्याप्रमाणे या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील. त्यामुळे 31 ऑगस्टनंतरही महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे.