मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : लाडकी बहीण योजना बंद होणार ?………

मंडळी महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकरी कुटुंबांतील मुलींसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. पन समाज माध्यमांवर अफवा पसरली की या योजनेसाठी इतर शासकीय योजना बंद करण्यात आल्या आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणले की लाडकी बहीण योजनेमुळे कोणत्याही इतर योजना बंद होणार नाहीत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणारी मदत बंद केल्याची बातमी पूर्णता चुकीची आहे. शेतकरी कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या मदतीत कोणताही अडथळा आलेला नाही. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी आवश्यक तेवढी तरतूद उपलब्ध आहे. केवळ उणे प्राधिकर पत्र यंत्रणा बंद करण्यात आली आहे कारण तिच्या माध्यमातून तातडीच्या निधीची गरज उरलेली नाही. मदत व पुनर्वसन विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत सविस्तर माहिती दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजना तिसरी लाभार्थी यादी जाहीर , त्वरित चेक करा तुमचे नाव

विरोधकांचा आरोप आणि सरकारचे प्रत्युत्तर

मित्रानो राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी ४५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विरोधकांनी या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण येईल असे म्हणत इतर योजनांच्या बंदीबाबत चिंता व्यक्त केली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी या दाव्याचे खंडन केले आहे आणि शेतकरी कुटुंबांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांमध्ये कोणताही बदल होणार नाही असे स्पष्ट केले आहे.

ही योजना मुलींच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे इतर शेतकरी मदत योजना बंद होणार नाहीत, याची खात्री मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. राज्य सरकार नागरिकांमध्ये गैरसमज पसरू नये यासाठी पारदर्शकतेचा अवलंब करीत आहे.

लाडकी बहीण योजनेचे दुसऱ्या टप्प्याचे 3000 हजार महिलांच्या खात्यात जमा, तुमच्या बँकेत आले का?

सरकारच्या या स्पष्टिकरणानंतर शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment