ladaki bahin yojana aditi tatkare मित्रांनो राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने तीन दिवसांत 96 लाख महिलांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 3,000 रुपये जमा केले आहेत. 14 ऑगस्टच्या संध्याकाळपासून महिला यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
प्रथम टप्प्यात 80 लाख महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा करण्यात आले. यानंतर आज सरकारने 16 लाख अतिरिक्त पात्र महिलांना लाभ प्रदान केला आहे, असे महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
लाभार्थी यादी जाहीर
आदिती तटकरे यांनी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. आज सकाळपासून 16 लाख 35 हजार महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले आहेत, तर पूर्वीच्या टप्प्यात 80 लाख महिलांचे थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले आहे.
सद्यस्थितीत एकूण 96 लाख 35 हजार महिलांना योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळवण्यासाठी महिला व बालविकास विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.
लाभार्थी यादी जाहीर
मित्रांनो योजना संदर्भात आधी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती, पण आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की अर्ज करण्याची अंतिम तारीख ठरलेली नाही. अर्ज प्रक्रियेला सतत सुरू ठेवले जाईल, त्यामुळे 31 ऑगस्टनंतरही महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करता येईल.